सिंदखेडराजा- राजमाता जिजाऊ माँ साहेबांची आज ४२१ वी
जयंती त्यानिमित्ताने त्यांची जन्मभूमी असलेल्या सिंदखेड राजा येथे दरवर्षी
लाखोंच्या संख्येने शिवभक्तांची उपस्थिती असते. यावर्षी ही हजारो शिवभक्तांनी
सिंदखेड येथे हजेरी लावली आहे.
राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त जिजाऊ माँसाहेबांच्या दर्शनासाठी
हजेरी लावत असतात. या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांमध्ये अमाप उत्साह आणि शिवभक्ती
ओसंडून वाहत असते. यावर्षी तर शुक्रवार रात्रीपासूनच गर्दी जमायला सुरवात झाली आणि
गर्दीचे सर्व रेकॉर्ड शिवभक्तांनी मोडीत काढले आहेत. जिजाऊंच्या जयंती निमित्त
येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छ. शिवाजी महाराजांच्या वेशभुषेत
आलेल्या तरुणांनी याठिकाणी सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
जिजाऊ माँसाहेबांचा जन्म येथील भुईकोट
राजवाड्यात १२ जानेवारी १५९८ साली झाला होता